WTC 2027 Updated Points Table : भारत-इंग्लंड यांच्यासह आतापर्यंत ९ पैकी ६ संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या चौथ्या हंगामाला सुरुवात केली आहे. श्रीलंकेच्या संघाने बांगलादेश विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिका १-० अशी आपल्या नावे केली. या निकालसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या संघाला टाकले मागे
गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील उप विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसह नव्या चक्राची सुरुवात केली. पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशी जिंकत ऑस्ट्रेलियन संघ WTC गुणतालिकेत १०० टक्के विनिंग पर्सेंटेजसह अव्वलस्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभूत करून १०० टक्के विनिंग पर्सेंटेज असूनही इंग्लंडचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे.
WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास!
श्रीलंकेच्या संघाने मारली बाजी
घरच्या मैदानातील बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जिंकत श्रीलंकेच्या संघाने ६६.६७ टक्के विनिंग पर्सेंटेजसह WTC गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे बांगलादेश संघ ३३.३३ विनिंग पर्सेंटेजवरून १६.६७ विनिंग पर्सेंटेजवर आला असून हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियासह वेस्ट इंडिजच्या पदरी भापळा
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या मोहिमेला सुरुवात केली. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात ५ शतके झळकावूनही टीम इंडियाला या सामन्यात इंग्लंडच्या संघाने ५ विकेट्स राखून पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघ अजूनही खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजची अवस्थाही तिच आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे त्यांच्या पदरी देखील पहिल्या सामन्यानंतर भोपळाच आलाय. हे दोन्ही संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांनी अद्याप आपल्या मोहिमेला सुरुवात केलेली नाही.
WTC २०२५-२७ गुणातालिकेत कोणता संघ कितव्या स्थानावर?स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | धावगती | गुण | विजयी टक्केवारी |
१ | ऑस्ट्रेलिया | १ | १ | ० | ० | - | १२ | १०० टक्के |
२ | इंग्लंड | १ | १ | ० | ० | - | १२ | १०० टक्के |
३ | श्रीलंका | २ | १ | ० | १ | - | १६ | ६६.६७ टक्के |
४ | बांगलादेश | २ | ० | १ | १ | - | ४ | १६.६७ टक्के |
५ | भारत | १ | ० | १ | ० | - | ० | - |
६ | वेस्ट इंडिज | १ | ० | १ | ० | - | - | - |
७ | दक्षिण आफ्रिका | - | - | - | - | - | - | - |
८ | न्यूझीलंड | - | - | - | - | - | - | - |
९ | पाकिस्तान | - | - | - | - | - | - | - |
Web Title: Updated WTC Points Table 2025-27 After Sri Lanka vs Bangladesh 2nd Test Australia England In Top 2 Team India At No 5
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.