Twitterati compare Rashid Khan with Salman Khan after his declaration of marrying only after winning the World Cup | अफगाणिस्तानच्या रशीद खानची होतेय 'दबंग' सलमानशी तुलना; कारण जाणून थक्कच व्हाल

अफगाणिस्तानच्या रशीद खानची होतेय 'दबंग' सलमानशी तुलना; कारण जाणून थक्कच व्हाल

बॉलिवूडचा दबंग खान याच्याशी आता अफगाणिस्ताचा फिरकीपटू रशीद खान याची तुलना होऊ लागली आहे. रशीद खाननं नुकताच धक्कादायक दावा केला होता.  अफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच लग्न करणार असल्याचा निर्धार 21 वर्षीय रशीद खाननं व्यक्त केला. अफगाणिस्ताननं बांगलादेशला त्यांच्याच घरी कसोटी सामन्यात पराभूत करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता.

विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मुलगा येणार अडचणीत; 'त्या' व्हिडीओनंतर पोलीस करणार तपास!

रशीद जगभरातील अनेक ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळतो. त्यामुळे त्याचा महिला चाहता वर्गही अधिक आहे. त्यानं नुकत्याच एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला,''अफगाणिस्तान संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी लग्न करीन.''

त्याच्या या उत्तरानंतर त्याची तुलना सलमान खानशी करण्यात येऊ लागली आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या लग्नाचा विषय नेहमी छेडला गेला आहे, परंतु त्याचं उत्तर अजून कुणालाच सापडलेलं नाही. सलमान 54 वर्षांचा झाला आहे आणि अजूनही त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. 
 


अन्य मह्त्त्वाच्या बातम्या

अमिताभ बच्चन यांना दहशतवादी देशातून शुभेच्छा नकोत; नेटकऱ्याच्या ट्विटला शोएब अख्तरनं दिलं उत्तर!

भारतीय फलंदाजाच्या घरी हलला पाळणा; झाला मुलीचा बाप! 

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनकडून मोठी चूक; आयसीसी करणार कारवाई? 

विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

अमिताभ, अभिषेक बच्चन यांना झाला कोरोना; शाहिद आफ्रिदीनं केलं ट्विट, म्हणाला...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Twitterati compare Rashid Khan with Salman Khan after his declaration of marrying only after winning the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.