England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

ICC World Test Championship या विजयासोबतच विंडीजनं गुणांचे खाते उघडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:48 PM2020-07-13T13:48:36+5:302020-07-13T13:49:32+5:30

whatsapp join usJoin us
England vs West Indies 1st Test: Updated World Test Championship points table after West Indies beat England by 4 wickets in 1st test | England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

England vs West Indies 1st Test: विंडीजच्या विजयानंतर ICC World Test Championship गुणतालिकेत झाले फेरबदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोनाच्या संकटात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघानं विजयाचा मान पटकावला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले 200 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून सहज पार केले. जेरमेन ब्लॅकवूड ( 95) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत खाते उघडले आहेत. ICC World Test Championship 

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, विंडीज गोलंदाजांसमोर त्यांच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. विंडीज कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रीएल यांनी अनुक्रमे 6 व 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळला. बेन स्टोक्स ( 43) आणि जोस बटलर ( 35) यांनी संघर्ष केला. वेस्ट इंडिजनं प्रत्युत्तरात 318 धावा करताना 114 धावांची आघाडी घेतली. क्रेग ब्रेथवेट ( 65), शेन डॉवरीच ( 61) आणि रोस्टन चेस ( 47) यांनी दमदार खेळ केला.  ICC World Test Championship 

इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. रोरी बर्न्स ( 42) आणि डॉम सिब्ली ( 50) यांनी दमदार सुरुवात करून दिली. झॅक क्रॅवली ( 76) आणि कर्णधार बेन स्टोक्स (46) यांनी संघर्ष केला, परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी यजमानांना झटके दिले. इंग्लंडचा दुसरा डाव 313 धावांत गुंडाळला. शॅनोन गॅब्रीएलनं 5 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. पण, ब्लॅकवूडनं एकाकी खिंड लढवून विंडीजचा विजयया विजयासोबतच विंडीजनं गुणांचे खाते उघडले आहे. पक्का केला. विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ICC World Test Championship 

त्यांच्या खात्यात 40 गुण जमा झाले असून ते आता 7 व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला मागे टाकले आहे. 
गुणतालिकेत कोण कितव्या स्थानी?
1) भारत - 360 गुण
2) ऑस्ट्रेलिया - 296 गुण
3) न्यूझीलंड - 180 गुण
4) इंग्लंड - 146 गुण
5) पाकिस्तान - 140 गुण
6) श्रीलंका - 80 गुण
 

Web Title: England vs West Indies 1st Test: Updated World Test Championship points table after West Indies beat England by 4 wickets in 1st test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.