Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर

Thank You Rohit Sharma, Test Cricket Retirement: चेन्नई सुपर किंग्जकडूनही रोहितला खास शुभेच्छा देण्यात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:44 IST2025-05-07T22:43:47+5:302025-05-07T22:44:30+5:30

whatsapp join usJoin us
Thank You Rohit Sharma Who said what after the hitman Test retirement Read in detail | Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर

Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Thank You Rohit Sharma, Test Cricket Retirement: भारतीय संघाचा धडाकेबाज कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून त्याने ही माहिती दिली. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये चाहत्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले. टी२० मधून आधीच निवृत्त झालेला रोहित आज कसोटीतूनही निवृत्त झाला. त्यामुळे आता तो केवळ वनडेच्या मैदानातच दिसणार आहे. रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर ICC चेअरमन जय शाह यांच्यासह अनेकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. 'भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहीन', असे रोहित शर्माने म्हटले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला, जो भारताने गमावला होता.

जय शाह म्हणाले, "रोहित, कसोटी क्रिकेटमधील तुझ्या निर्भिड नेतृत्वशैलीसाठी तुझे अभिनंदन. तू कसोटी क्रिकेटमध्ये आमचे खूप मनोरंजन केलेस. चाहत्यांना तू तुझ्या खेळीच्या जोरावर खिळवून ठेवलेस. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा." 

बीसीसीआयने सुंदर व्हिडीओ पोस्ट करत रोहितला धन्यवाद म्हटले.

ICC ने रोहित शर्माचे टीम इंडियातील काही निवडक फोटो पोस्ट करत रोहितला शुभेच्छा दिल्या.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहितचे वर्णन अप्रतिम मास्टर, एक चांगला लीडर आणि क्रिकेटमधील रत्न असे कौतुक केले.

मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर रोहितसाठी खास डिझाइनचा फोटो पोस्ट करण्यात आला.

चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियाने रोहितला शुभेच्छा दिल्या. रोहित हा एक असा लीडर आहे ज्याने नव्या पिढीच्या खेळाडूंना आकार दिला. कसोटी क्रिकेटमधील तुझ्या कारकीर्दीसाठी धन्यवाद, असे CSK ने ट्विट केले.

रोहित हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४ हजार ३०१ धावा केल्या. रोहितने २४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यातील १२ सामने जिंकले आणि नऊ सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. रोहितच्या निवृत्तीनंतर आता आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळणार हे स्पष्ट झाले असून जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.

Web Title: Thank You Rohit Sharma Who said what after the hitman Test retirement Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.