Team India will loss top spot on ICC Test Ranking, Kiwi's chance to overtake | टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान धोक्यात, कोणाचे आव्हान?

टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान धोक्यात, कोणाचे आव्हान?

गॉलः भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि ट्वेंटी-20 ( 3-0) पाठोपाठ टीम इंडियाचे वन डे मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ या मालिकेत फेव्हरिट आहे. पण, त्यांचे हे अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी न्यूझीलंडला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 111 गुण आहेत, तर अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात 113 गुण आहेत. न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने श्रीलंकेला नमवल्यास ते अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतात. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक सामना चुरशीचा होणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.  1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल.Web Title: Team India will loss top spot on ICC Test Ranking, Kiwi's chance to overtake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.