न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल पुन्हा एकदा नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून देण्यास सज्ज आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी शुभमन गिल याने पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. यावेळी टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघातून वगळलेल्या निर्णयावर तो पहिल्यांदाच बोलला आहे. निवड समितीच्या निर्णयायाचा आदर करतो, असे म्हणत जो संघ निवडला आहे, तो भारतीय संघ जेतेपद पटकावेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून वगळलेल्या मुद्यावर शुबमन गिल म्हणाला, "आयुष्यात मी जिथे असायला हवं, तिथेच आहे. माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते मला नक्की मिळेल. एक खेळाडू म्हणून मला संघासाठी सामने जिंकायचे आहेत. मी निवड समितीच्या निर्णयाचा आदर करतो. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ते वर्ल्ड कप जिंकतील, अशी आशा आहे."
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
आशिया कप स्पर्धेत गिलनं २ वर्षांनी टी-२० संघात कमबॅक केलं, पण...
मागील वर्षी टी-२० प्रकारात झालेल्या आशिया कप स्पर्धेसाठीच्या शुभमन गिलला पहिली पसंती देण्यात आली. दोन वर्षांनी तो संघात आला. एवढेच नाही तर पुन्हा एकदा उप कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आले. पण संघ व्यवस्थापनाने त्याच्या ठेवलेला भरवसा फोल ठरला. सातत्याने कामगिरीत तो अपयशी ठरला. शुभमन गिलला संजूच्या जागी सलामीवीराच्या रुपात खेळवण्यात आले. परिणामी वर्षभरात आंतरराष्ट्रीय सामन्यात ३ शतके झळकावून संजूवर सलामीवीराच्या रुपातच नव्हे तर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होण्याची वेळ आली. पण गिलच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे अखेर BCCI निवडकर्त्यांनी चूक सुधारत संजूवर भरवसा दाखवला.
गिलला टीम बसमध्येच समजली होती वर्ल्ड कप संघातून पत्ता कट झाल्याची बातमी
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून आपला पत्ता कट झाला आहे ही माहिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या T20I सामन्यापूर्वीच गिलला समजली होती. बसमधून प्रवास करत असताना त्याला आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी निवड होणार नाही हे समजले होते.
गिल आउट, इशान किशनला सरप्राइज
गिल संघाबाहेर झाल्यामुळे आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडीच भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल, हे जवळपास निश्चित आहे. गिलला ज्या संघात स्थान मिळवण्यात अपयश आले त्या संघात इशान किशनलाही लॉटरी लागली होती. तो सलामीरासह फिनिशरच्या रुपात सर्वोत्तम कामगिरी करु शकेल, असा फलंदाज आहे.