Shikhar Dhawan Sophie Shine Engagement : टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन आता वैयक्तिक आयुष्यातील सर्वात सुंदर इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. पहिल्या प्रेमात फटका बसल्यावर आयरिश सुंदरीच्या प्रेमात पडलेल्या शिखर धवनने अखेर नव्या वर्षात नव्या इनिंगची सुरुवात करण्यासाठी लग्नाआधीची पायरी चढली आहे. माजी क्रिकेटरनं गर्लफ्रेंड सोफी शाइन हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
"आनंदी क्षणापासून ते अगदी एकमेकांसोबत स्वप्ने शेअर करण्यापर्यंतचा प्रवास. आम्ही दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांतील कॅप्शनसह एक खास फोटो शेअर करत क्रिकेटरनं साखरपुडा उरकल्याची गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोवर ‘शिखर आणि सोफी’ यांची स्वाक्षरीही पाहायला मिळते.
शिखर धवन दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत 'या' दिवशी होणार विवाहबद्ध
‘गब्बर’च्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहर
शिखर धवन आणि सोफीनं आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गायक हार्डी संधू, मॉडेल-अभिनेत्री-उद्योजिका नेहा शर्मा आणि दिग्दर्शक-अभिनेता अभिषेक कपूर याने रेड हार्ट इमोजी शेअर या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या शिखर धवनसाठी ही नवी सुरुवात नव्या इनिंगसारखीच आहे. मैदानावर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा धवन आता आयुष्यातही नव्या पर्वाची सुरुवात करताना दिसतोय.
कोण आहे सोफी शाइन?
सोफी शाइन ही आयर्लंडची रहिवासी असून ती व्यावसायिकदृष्ट्या मार्केटिंग एक्स्पर्ट आहे. ती शिखर धवन फाउंडेशनची प्रमुखही आहे. शिखर आणि सोफी यांची ओळख काही वर्षांपूर्वी दुबईत झाली होती. आधी मैत्री झाली अन् मग हळूहळू या मैत्रीच प्रेमात रुपांतर झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून धवन सातत्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसला होता. आता खास पोस्ट शेअर करत त्याने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज असल्याची गोष्ट शेअर केली आहे.