देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील प्रतिष्ठित सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गुजरातच्या उर्विल पटेल आणि आर्या देसाई या जोडीनं पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच सर्विसेज विरुद्ध पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. या सामन्यात उर्विल पटेल याने ३१ चेंडूत शतक झळकावले. पण उर्विल- आर्या जोडीनं सेट केलेला रेकॉर्ड अवघ्या काही तासाभरात मोडीत निघाला. केरळ संघाकडून संजू सॅमसन आणि रोहन रोहन कुन्नुमल यांनी या स्पर्धेतील सलामीला सर्वाधिक मोठ्या भागीदारीचा विक्रम आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू आणि रोहनचा धमाका! पहिल्या विकेटसाठी केल्या १७७ धावा
केरळच्या संघाच्या डावाची सुरुवात करताना ओडिशा विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन आणि रोहन रोहन कन्नूमल यांनी पहिल्या विकेटसाठी १७७ धावांची नाबाद भागीदारी रचली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील ही सलामीवीरांनी केलेली विक्रमी भागीदारी ठरली. रोहन याने ६० चेंडूत १२१ धावांची खेली केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले. भारतीय टी-२० संघात ज्या संजूवर सलामीवीराच्या रुपातच नव्हे तर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले त्याने आपल्यातील धमक दाखवताना ४१ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी साकारली. रोहन आक्रमक खेळतोय हे पाहून त्याने त्याला अधिक स्ट्राइक देण्यावर भर दिला.
अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका
एक विक्रम तीन वेळा मोडला!
यंदाच्या हंगामा आधी सय्य मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड हा मनन वोहरा आणि अर्जुन आझाद या जोडीच्या नावे होता. २०२३ च्या हंगामात चंडीगड संघाकडून खेळताना बिहार विरुद्ध दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५९ धावा केल्या आहे. यंदाच्या हंगामात हा रेकॉर्ड तीन वेळा मोडीत निघाला. उर्विल-आर्या, संजू-रोहन याशिवाय मेघालय संघाकडून किशन आणि अर्पित जोडीन मणिपूर विरुद्ध पहिल्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी रचली.