Sakshi Dhoni slams Jharkhand govt on zero power cut claim, complains of erratic power supply | भाजप सरकारचा 'तो' दावा धोनीच्या पत्नीनं ठरवला चुकीचा; सोशल मीडियावर केली नाराजी प्रकट
भाजप सरकारचा 'तो' दावा धोनीच्या पत्नीनं ठरवला चुकीचा; सोशल मीडियावर केली नाराजी प्रकट

झारखंड : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि धोनी यांच्या भेटीनंतर तर कॅप्टन कूल भाजपाचा झेंडा हाती घेणार, हे जवळपास निश्चित समजले जात होते. त्यामुळे धोनी आणि भाजपा अशा अनेक बातम्या रंगल्या. असे असताना धोनीची पत्नी साक्षीनं भाजपा सरकार विरोधात नाराजी प्रकट केली आहे. तिनं भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. झारखंडमधील भाजप सरकारवर निशाणा साधत साक्षीनं सोशल मीडियावर तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. झारखंड सरकारकडून राज्यात लोडशेडिंग नसल्याचा दावा केला जात होता आणि साक्षीनं त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. 

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात दिवसातून अनेक तास वीज जाते, असे सांगत साक्षीनं तक्रार नोंदवली. तीनं सोशल मीडियावरही नाराजी प्रकट केली. तिनं लिहीले की,''रांचीतील लोकं रोज लोडशेडिंगचा सामना करत आहेत. दिवसातून चार ते सात तास वीज नसते.'' 


तिनं पुढे लिहीले की,''गुरुवाती जवळपास पास तास वीज नव्हती. हवामान चांगले होते किंवा कोणताही सण नव्हता, तरीही वीज का नव्हती यामागचं कारण कळलेलं नाही.''  

झारखंड राज्य सरकारचा कार्यकाळ 27 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनी काय काम केलं, याचे दावे केले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात लोडशेडिंग नसल्याचा दावा केला आहे. 
 


Web Title: Sakshi Dhoni slams Jharkhand govt on zero power cut claim, complains of erratic power supply
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.