Daryl Mitchell Surpasses Rohit Sharma for No. 1 Men's ODI Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नव्याने जारी केलेल्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्माला फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शतकी खेळीसह रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला होता. पण आता त्याची जागा न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल याने घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित आणि डॅरिल यांच्यात अवघ्या एका गुणाचं अंतर
डॅरिल मिचेल याच्या खात्यात ७८२ रेटिंग पॉइंट्स आहेत. अवघ्या एका अतिरिक्त गुणासह त्याने रोहित शर्माकडील नंबर वनच्या ताजवर कब्जा केला आहे. रोहित शर्मा ७८१ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत दुसऱ्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील हिट शोसह तो पुन्हा नंबर वनवर विराजमान होऊ शकतो. मागे टाकले आहे.
असा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला डॅरिल मिचेल
न्यूझीलंड्या पठ्ठ्यानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील शतकी कामगिरीसह आपल्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच वनडे क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकावत इतिहास रचला आहे. ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकवणारा तो न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी १९७९ मध्ये ग्लेन टर्नर यांनी नंबर वन कामगिरी करुन दाखवली होती.
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
जे केन विल्यमसन, मार्टिन गप्टील अन् रॉस टेलरला नाही जमलं ते मिचेलनं करून दाखवलं
न्यूझीलंडच्या संघाकडून अनेक स्टार खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडली आहे. मार्टिन क्रो, अँड्र्यू जोन्स, रॉजर टोस, नॅथन अॅस्टल, केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल आणि रॉस टेलर या दिग्गजांची ICC क्रमवारीत अनेकदा आघाडीच्या पाचमध्ये वर्णी लागली. पण कुणालाही नंबर वनचा डाव साधणं जमलं नव्हते.
पाकिस्तानी खेळाडूंही फायद्यात
पाकिस्तानच्या संघाने शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा विजय नोंदवला होता. याचा संघातील खेळाडूंना फायदा झाला आहे. मोहम्मद रिझवान पाच स्थानांच्या सुधारणेसह फलंदाजांच्या क्रमवारीत २२ व्या स्थानावर पोहचला असून फखर झमान ५ स्थानांच्या सुधारणेसह २६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अबरार अहमद याने ११ स्थानांच्या सुधाणणेसह टॉप १० मध्ये एन्ट्री मारली असून तो आता नवव्या क्रमांगार आहे. हॅरिस राउफ ५ स्थानांनी उंच उडी मारत २३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान गोलंदाजीत अव्वलस्थानी आहे.