रोहितला लागले ऑस्ट्रेलियाचे वेध, कसोटी खेळण्यास उत्सुक 

या वर्षअखेर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी काहीतरी तोडगा काढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:31 AM2020-05-10T01:31:14+5:302020-05-10T07:44:11+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma looking forward to playing Tests Cricket in Australia | रोहितला लागले ऑस्ट्रेलियाचे वेध, कसोटी खेळण्यास उत्सुक 

रोहितला लागले ऑस्ट्रेलियाचे वेध, कसोटी खेळण्यास उत्सुक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला ‘लॉकडाऊन’मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्याचे वेध लागले आहेत. वर्षअखेर भारतीय संघ आॅस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. उभय संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका रद्द झाल्यास क्रिकेट आॅस्ट्रेलियाला मोठे नुकसान होणार आहे. ज्यामुळे बीसीसीआयनेही ही मालिका खेळण्याची तयारी  दाखवली आहे.

रोहित म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला नेहमी आवडते. मागच्यावेळी  आम्ही आॅस्ट्रेलिया दौºयात कसोटी मालिका जिंकलो होतो, आमच्या संघासाठी ती एक मोठी कामगिरी होती. या वर्षअखेर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी काहीतरी तोडगा काढावा.’

आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरशी रोहित ‘इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट’वर बोलत होता. प्रेक्षकांसाठीही ही स्पर्धा रोमहर्षक ठरणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात होण्यासाठी मालिका योग्य आहे. रोहितने सहकारी शिखर धवनबद्दलही अनेक गुपिते यावेळी उघड केली. ‘शिखर धवन फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर चांगला खेळतो, पण ज्यावेळी फटकेबाजीची वेळ येते त्यावेळी तो त्यांच्यावर फारसा प्रहार करत नाही,’ असे रोहितने स्पष्ट केले.

शिखर धवन वेडा माणूस आहे, त्याला कधीही पहिला चेंडू खेळायचा नसतो. त्याला फिरकीपटूंना फटकेबाजी करायची नसते. कधीकधी तो खूप विचित्र वागतो. कधीकधी तुम्ही सामन्यात एखादे डावपेच आखत असता तेव्हा पाच सेकंदांनी हा माणूस विचारतो, काय म्हणत होतास? विचार करा, तुम्ही सामन्यात खूप तणावाखाली असता आणि हा माणूस असे काहीतरी बोलून जातो. अशा गोष्टींमुळे आपल्याला कधीकधी त्याचा फार राग येतो.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Rohit Sharma looking forward to playing Tests Cricket in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.