RCB vs SRH: युझवेंद्र चहलनं फिरवला सामना, RCBनं विजयी सलामी दिली

RCB vs SRH Live Score : देवदत्त पडीक्कल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलनं केलेल्या सुरेख गोलंदाजीनं RCBला विजय मिळवून दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 06:27 PM2020-09-21T18:27:14+5:302020-09-21T23:51:29+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs SRH Live Score Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates | RCB vs SRH: युझवेंद्र चहलनं फिरवला सामना, RCBनं विजयी सलामी दिली

RCB vs SRH: युझवेंद्र चहलनं फिरवला सामना, RCBनं विजयी सलामी दिली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना चुरशीचा झाला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी दमदार सुरूवात केली. देवदत्त-फिंच यांनी रचलेल्या मजबूत पायावर Mr. 360 एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) ने धावांचा डोंगर उभा केला. पण, जॉनी बेअरस्टो ( Jonny  Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते, परंतु युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ( Chahal) तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला सामन्यात कमबॅक करून दिले. RCBनं त्यानंतर सामना सहज जिंकला. 
 

RCB vs SRH Live Score & Updates 

Image

- पुढच्या षटकात शिवम दुबे ( Shivam Dube) SRHच्या दोन फलंदाजांना बाद केले. प्रियांक गर्गला त्रिफळाचीत केल्यानंतर अभिषेक वर्मा व रशीद खान यांच्यात जोरदार टक्कर झाली. त्यात अभिषेक धावबाद झाला. त्यानंतर नवदीन सैनीनं भेदक मारा करताना RCBचा विजय पक्का केला. सैनीनं एकाच षटकात भुवनेश्वर कुमार व रशीद खान यांचा त्रिफळा उडवला. 

- बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही. युझवेंद्रनं 4 षटकात 18 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या.

-  दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही.

- . दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. 

- पण, बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी SRHचा डाव सावरला. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यात बेअरस्टोला RCBच्या फिंचनं जीवदान दिले. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युझवेंद्र चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. 


लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कॉन्फिडन्ट वाटला. त्यानं डेल स्टेनच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकारही खेचला. वॉर्नर हा सामना एकहाती घेऊन जाईल असेच वाटत होते, परंतु दुर्दैवानं त्याची विकेट पडली. उमेश यादवनं टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने स्ट्रेट फटका मारला. यादवनं तो झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू उलट दिशेच्या यष्टींवर आदळला आणि वॉर्नरला माघारी जावं लागलं. 

पाहा नेमकं काय घडलं.

Image

- एबी डिव्हिलियर्सची फटकेबाजी पाहा

देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं

- डेव्हिड वॉर्नर दुर्दैवी बाद

Image

- सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर एबीनं दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या.

- सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. 

- 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. 

- देवदत्तनं आजच्या खेळीसह एक वेगळा विक्रमही केला. प्रथम श्रेणी ( 77 धावा), लिस्ट ए ( 58 धावा) क्रिकेटमध्ये, ट्वेंटी-20 ( 53*) आणि IPL पदार्पणात त्यानं 56 धावा केल्या आहेत.  

- देवदत्त पडीक्कल ( Padikkal) पाठोपाठ आरोन फिंच ( Finch) माघारी परतला

- कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 

RCBसाठी देवदत्त धावून आला, पॉवर प्लेमध्ये SRHला दाखवली 'Power'!

- RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल  ( Devdutt Padikkal) हे सलामीला आले. पदार्पणातच RCBच्या देवदत्त पडीक्कलनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण केलं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये RCBनं बिनबाद 53 धावा चोपल्या
 

- सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

- टी नटराजनला दोन वर्ष राखीव म्हणून बसल्यावर अखेर मिळाले हैदराबादच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान

- सनरायझर्स हैदराबादचा संघ ( Sunrisers Hyderabad Playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, प्रियांक गर्ग, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.

Image

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore Playing XI) - आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, उमेश यादव, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल. 

Image

RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!

RCB vs SRH Latest News : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांनी बदललं स्वतःचं नाव, जाणून घ्या कारण

RCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक

वेदर रिपोर्ट । तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहील. उकाडा असेल. वेगवान वाºयाची दाट शक्यता.
पीच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता. फलंदाज स्थिरावले तर धावा वसूल करू शकतात.

मजबूत बाजू

आरसीबी । अ‍ॅरोन फिंचच्या समावेशामुळे फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे.
हैदराबाद । वॉर्नर व जॉनी बेयरस्टॉ सर्वांत धोकादायक सलामीच्या जोडीपैकी एक. फिरकीपटू राशिद खानची उपस्थिती.

कमजोर बाजू
आरसीबी । प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला लगाम घालणे कठीण. उमेश यादव व डेल स्टेन यांच्यावर विसंबून.
हैदराबाद । तळाची फळी कमकुवत. अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद यांच्यासारख्या युवा खेळाडूंवरील विश्वास अंगलट येण्याची शक्यता.

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore Players List (RCB)- एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.
  • सनरायझर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad Players List (SRH)- अभिषेश शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, डेव्हीड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद  खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, पियाम गर्ग, विराट सिंग, मिचेल मार्श,  फॅबीयन अॅलन, संदीप बवानका, संजय यादव, अब्दुल समद
     

Web Title: RCB vs SRH Live Score Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.