ठळक मुद्देRCBच्या 163 धावांचा पाठलाग करताना SRH चा डाव 153 धावांवर गडगडलायुजवेंद्र चहलनं 4 षटकांत 18 धावा देताना 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्यानवदीप सैनी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन, तर डेल स्टेननं एक विकेट घेतली
रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील एकतर्फी वाटत असलेला सामन्यात युजवेंद्र चहलनं ट्विस्ट आणला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) खेळपट्टीवर असेपर्यंत सामना SRHच्या मुठीत होता, पण युजवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामन्याचे चित्रच बदलले. या सामन्यात विराट कोहलीनंही ( Virat Kohli) एका विक्रमाला गवसणी घालताना महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्या मानाच्या पंक्तित स्थान पटकावले. ( RCB vs SRH Live Score & Updates )
युझवेंद्र चहलनं SRHच्या तोंडचा घास पळवला, विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले
RCBकडून आयच्या सामन्यात IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कलनं ( Devdutt Padikkal) दमदार बॅटींग केली. आत्मविश्वासानं भरलेल्या देवदत्तनं आजच्या कामगिरीनं RCBची सलामीची चिंता मिटवली. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या देवदत्तनं ( Padikkal) आरोन फिंच ( Aaron Finch) सारख्या अनुभवी फलंदाजासह RCBला दमदार सुरुवात करून दिली. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 56 धावा केल्या. त्यानं प्रथम श्रेणी, लिस्ट ए, ट्वेंटी-20मध्ये पदार्पणाच्या सामन्यातील अर्धशतकाची परंपरा IPL मध्येही कायम राखली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याने दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा उभारता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार व फॉर्मात असलेला फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला.
चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही. युझवेंद्रनं 4 षटकात 18 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर SRHचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.
शिवम दुबे व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर डेल स्टेननं एक विकेट घेत SRHचा डाव 19.4 षटकांत 153 धावांवर गुंडाळला. एकेकाळी 2 बाद 121 अशा मजबूत स्थितित असलेला SRHचा डाव 153 धावांवर गडगडला. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी पाठवले. याआधी दिल्ली कॅपिटल्सनं 2019मध्ये सनरायझर्स हैदाराबाद विरुद्ध अखेरच्या पाच षटकांत 8 विकेट्स घेतल्या होत्या.
RCBचा हा विजय विराट कोहलीसाठी खास ठरला. IPL मध्ये 50 सामने जिंकणारा तो महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रोहित शर्मा ( Rohit Sharma), गौतम गंभीर यांच्यानंतरचा चौथा कर्णधार ठरला. विराटनं 2011 पासून RCBचे कर्णधारपद स्वीकारले आहे. त्यानं या सामन्यापूर्वी 110 सामन्यांत 49 विजय मिळवले होते. आज त्यानं विजयाचं अर्धशतक पूर्ण केलं. IPLमध्ये सर्वाधिक विजय MS Dhoni ( 105) च्या नावावर आहेत. त्यानंतर गंभीर ( 71) आणि रोहित शर्मा ( 60) यांचा क्रमांक येतो. धोनी ( 3), रोहित ( 4) आणि गंभीर ( 2) यांच्या नावावर एकूण 9 IPL जेतेपदं आहेत, तर रोहितची पाटी कोरीच आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं
देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज