Vidarbha Pro T20 League 2025 RCB Star Jitesh Sharma : आयपीएलच्या १८ व्या हंगामात RCB च्या संघाला चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा विकेट किपर बॅटर जितेश शर्मा एक मोठी संधी मिळाली आहे. आरसीबीचा नियमित कॅप्टन रजत पाटीदार याच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये तो काही सामन्यात कॅप्टन्सी करताना दिसला होता. स्फोटक फलंदाजीशिवाय त्याने या स्पर्धेत नेतृत्वातील खास झलकही दाखवून दिली. त्यामुळे अकोल्याच्या या पठ्ठ्याला आता मोठी लॉटरी लागली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यावर आणखी एका टी-२० लीगमध्ये मैदानात उतरणार आहे. यावेळी तो फक्त विकेट किपर बॅटर नाही तर कॅप्टन्सी करताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL नंतर आता या संघाचे नेतृत्व करताना दिसणार जितेश शर्मा
आयपीएल स्पर्धेनंतर जितेश शर्मा हा विदर्भ प्रो टी२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या टी-२० लीगमध्ये तो NECO मास्टर ब्लास्टर टीमचे नेतृत्व करताना दिसेल. आरसीबीशिवाय जितेश शर्मानं पजांब किंग्जच्या ताफ्यात असतानाही कार्यवाहू कर्णधार पदाची जबाबदारी बजावली आहे. त्यामुळे विदर्भ लीगमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाला निश्चितच फायदा होईल.
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
कधी अन् कुठं पाहता येईल सामना?
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील NECO मास्टर ब्लास्टरचा संघ ६ जूनला आपला पहिला सामना खेळणार आहे. सलामीच्या लढतीत हा संघ भारत रेंजर्स विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी २:४५ मिनिटांनी सुरु होईल. विदर्भ प्रो टी२० लीगमध्ये पगारिया स्ट्रायकर्स विरुद्ध नागपूर टायटन्स यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. विदर्भ प्रो टी २० लीगमधील सामने जियो सिनेमा, फॅनकोड आणि वेव्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लाइव स्ट्रीमिंग उपलब्ध असतील. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवर याचे थेट प्रेक्षपणही होणार आहे.
यंदाच्या IPL हंगामात दिसला जितेश शर्माचा जलवा
जितेश शर्मा सध्या कमालीची कामगिरी करताना दिसला आहे. आयपीएल २०२५ च्या स्पर्धेत त्याने १५ सामन्यात २६१ धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ३३ चेंडूत ८५ धावांची दमदार खेळी आली होती. या खेळीत त्याने ८ चेंडूत ६ षटकार मारले होते. आयपीएल कारकिर्दीतील ही त्याची सर्वोच्च खेळीही ठरली. आयपीएलच्या फायनल लढतीत जितेश शर्मानं १० चेंडूत महत्त्वपूर्ण २४ धावांचे योगदान दिले होते.
Web Title: RCB IPL Champion Jitesh Sharma Captain Of Neco Master Blaster Team In Vidarbha Pro T20 League 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.