Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ

Rinku Singh Priya Saroj Engagement: क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या मछलीशहरच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवारी पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:53 IST2025-06-08T15:50:43+5:302025-06-08T15:53:16+5:30

whatsapp join usJoin us
Priya Saroj Rinku Singh: Priya Saroj bursts into tears as Rinku puts on the ring; Watch the video from the engagement party | Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ

Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rinku Singh Priya Saroj Engagement Video: रिंकू सिंहने अंगठी घातली आणि खासदार प्रिया सरोज यांचा हात हातात घेतला. त्यानंतर काही क्षणातच प्रिया सरोज यांच्या डोळ्यात पाणी तरले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पाठमोर होतं अश्रू पुसले. पण, आनंदाश्रू काही थांबत नव्हते. साखरपुड्याच्या कार्यक्रमात हा भावूक क्षण बघायला मिळाला.

क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या मछलीशहरच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. लखनौतील द सेंट्रम हॉटेलमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी एकमेकांना अंगठी घातली.

प्रिया सरोज यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

रिंकू सिंहने प्रिया सरोज यांच्या बोटात अंगठी घातली. त्याचवेळी त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सुरूवातीला त्यांनी अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला. प्रिया सरोज खूपच भावूक झाल्या. अश्रू अनावर झाल्यानंतर त्या पाठमोर झाल्या आणि अश्रू पुसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंचतारांकित द सेंट्रम हॉटेलमध्ये झालेल्या या साखरपुडा सोहळ्याला माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पीयूष चावला आणि आर्यन जुयाल हे उपस्थित होते.

वाचा >>क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics

खासदार प्रिया सरोज यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने अनेक राजकीय नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव, राम गोपाल, बीबीसीआयचे अध्यक्ष उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. 

रिंकू सिंहने मुंबईहून मागवली होती अंगठी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांनी एकमेकांसाठी विशेष अंगठी खरेदी केली होती. प्रिया सरोजने कोलकातातून अंगठी मागवली होती, तर रिंकू सिंहने मुंबईवरून. 

Web Title: Priya Saroj Rinku Singh: Priya Saroj bursts into tears as Rinku puts on the ring; Watch the video from the engagement party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.