श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानात झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा धक्का देत यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर करणाऱ्या निकालाची नोंद केली आहे.
याआधी २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट्सने विजय नोंदवत क्रिकेट जगताला आश्चर्यचकित करून सोडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा झिम्बाब्वेनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कांगारूंची शिकार केल्याचे पाहायला मिळाले.
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना अमेरिकेच्या संघाने डॅलसच्या मैदानात पाकिस्तानला धक्का दिला होता. या पराभवामुळे पाकिस्तानी संघाला साखळी फेरीतीच गाशा गुंडाळावा लागला. दुसऱ्या बाजूला पदार्पणाच्या स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीत संपुष्टात आला. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला.
२०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला ५५ धावांनी पराभवाचा धक्का देत मोठ्या उलटफेर करुन दाखवला होता.
२०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडच्या संघाने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार इंग्लंडच्या संघाविरुद्ध ५ धावांनी विजय मिळवला होता.
२०२६ च्या हंगामात नागपूरच्या मैदानात अफगाणिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला ६ धावांनी मात देत क्रिकेट जगतात मोठ्या चमत्कारी विजयाची नोंद केली होती.