"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण

Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce reason revealed: चहल म्हणाला, "प्रत्येकाची स्वप्न असतात आणि लग्नानंतर..."

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या दीड-दोन वर्षांपासून क्रिकेटपेक्षाही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

युट्यूबर धनश्री वर्मा हिच्याशी युजवेंद्र चहलने कोरोनाकाळात लग्न केलं, पण चार वर्षातच दोघांनी घटस्फोट घेत वाटा वेगळ्या केल्या.

चहल-धनश्रीच्या नात्यात कुणाचं काय चुकलं, याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण आता खुद्द युजवेंद्र चहलनेच आपली चूक कबुल केली आहे.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये चहलला विचारण्यात आले की, तुमच्या नातं तुटण्यात तुझी चूक काय होती? त्यावर त्याने प्रामाणिक उत्तर दिले.

युजवेंद्र चहल म्हणाला, " जेव्हा दोन प्रतिभावान माणसं एकत्र येतात, तेव्हा गोष्टी नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते. कारण दोघांचीही आपापली स्वप्नं असतात."

"लहानपणापासून प्रत्येकाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्याची धडपड सुरू असते. लग्नानंतर पार्टनरने आपल्याला सपोर्ट करावा अशीच साऱ्यांची अपेक्षा असते."

"आमच्या लग्नानंतर मी खूप गोष्टींनी वेढला गेलो होतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. माझा वेळ सगळ्या गोष्टींमध्ये विभागला जात होता."

"मी खूपच बिझी राहायला लागल्याने मला नात्याकडे अपेक्षित लक्ष देताच आलं नाही. आणि हे जेव्हा सतत व्हायला लागतं, तेव्हा नात्यात दुरावा येतो," अशी प्रामाणिक कबुली चहलने दिली.