भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा यावर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला. आता चहलने घटस्फोटावर मौन सोडलं. चहलने लग्नानंतर नेमकं काय झालं याबद्दल भाष्य केलं आहे.
युजवेंद्र चहलने या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा त्याच्यावर फसवणूकीचा आरोप झाला आणि घटस्फोटाची चर्चा रंगली तेव्हा तो मानसिक तणावातून गेला. मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ लागले असं म्हटलं आहे.
राज शमानीच्या यूट्यूब चॅनलवर चहल म्हणाला की, 'हे खूप दिवसांपासून चालू होतं. आम्ही ठरवलं की, जोपर्यंत आपण अशा परिस्थितीत पोहोचत नाही की जिथून परतणं शक्य नाही, तोपर्यंत काहीही बोलणार नाही. आम्ही सोशल मीडियावर सामान्य कपलसारखं राहू.'
जेव्हा चहलला विचारण्यात आलं की, तो त्यावेळी फक्त दिखावा करत होता का, तेव्हा त्याने मान हलवून सहमती दर्शवली. 'नातं हे एका करारासारखं असतं. जर एक नाराज असेल तर दुसऱ्याने ऐकलं पाहिजे. कधीकधी दोन लोकांचे स्वभाव जुळत नाहीत. मी भारतासाठी खेळत होतो, तीही तिचं काम करत होती. हे १-२ वर्षे चालू होतं.'
'मी इथे आणि तिथेही वेळ देत होतो, पण नात्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ उरला नव्हता आणि मग दररोज मला वाटायचं की जाऊदे, राहू दे. प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं ध्येय असतं. एक जोडीदार म्हणून तुम्हाला साथ द्यायची असते.'
'जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा लोकांनी मला फसवणूक करणारा म्हटलं. पण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाचीही फसवणूक केलेली नाही. माझ्या दोन बहिणी आहेत आणि मी माझ्या पालकांकडून महिलांचा आदर करायला शिकलो आहे.'
'जर माझं नाव एखाद्याशी जोडलं जात असेल तर लोक व्यूजसाठी त्याबद्दल काहीही लिहितात हे खरंतर गरजेचं नाही. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो.'
'मी २ तास रडायचो, फक्त २ तास झोपायचो. हे ४०-४५ दिवस सुरू होतं. मला क्रिकेटमधून ब्रेक हवा होता. मी क्रिकेटमध्ये इतका व्यस्त होतो की, मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो.'
'मी या गोष्टी माझ्या मित्रासोबत शेअर केल्या' असं चहलने म्हटलं आहे. बराच काळ डेटिंग केल्यानंतर चहल आणि धनश्रीने २२ डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं होतं. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे.