भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या वर्षभरात खूप चर्चेत राहिला. सुरुवातीला त्याने धनश्री वर्माशी घटस्फोट घेतला. त्यानंतर तो आरजे महावशसोबत दिसला.
आता युजी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने BMW Z4 खरेदी केली आहे. त्याने स्वतःच ही खुशखबर इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना सांगितले.
क्रिकेटपटू चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्याच्या पालकांनी नव्या कोऱ्या आलिशान कारचे कव्हर काढले आणि साऱ्यांना खुशखबर दिला.
'माझे प्रत्येक स्वप्न सत्यात आणणाऱ्यांसह मी नवी कार घरी आणली. पालकांना या क्षणाचे साक्षीदार करणे आणि आनंदी पाहणे हीच खरी लक्झरी,' असे चहल म्हणाला.
युजवेंद्र चहलने BMW Z4 ही प्रीमियम स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. ही लक्झरी कार भारतात अंदाजे ८८ लाखांपासून (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
BMW Z4 मध्ये 2998cc इंजिन आहे, जे 335 bhp आणि 500 Nm टॉर्क निर्माण करते, 250 किमी प्रतितास या टॉप स्पीडसह ती बाजारात उपलब्ध आहे.