Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:03 IST

Open in App
1 / 9

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग याच्या एका फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोशूटमध्ये तो एका परदेशी महिलेसोबत दिसत आहे.

2 / 9

युवराजने समुद्राच्या मध्यभागी एका आलिशान जहाजावर त्या सौंदर्यवतीसोबत पोज दिली आहे. युवराज आणि त्या तरुणीव्यतिरिक्त, इतर अनेक मॉडेल्स देखील तेथे दिसल्या आहेत.

3 / 9

या फोटोशूटमध्ये युवराजसह सर्वजण कॅज्युअल आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. ग्रुप फोटोंव्यतिरिक्त, युवराजचे एका तरुणीसोबत वेगवेगळे फोटो आहेत, ज्याची चर्चा रंगली आहे.

4 / 9

युवीसोबतच्या तरुणीच्या फोटोंमुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. या फोटोंनी सर्वात जास्त लक्ष वेधले आहे. चला तर मग, जाणून घेऊया नेमकी कोण आहे ती तरुणी...

5 / 9

युवराजसिंग सोबतची ही तरुणी कॅनेडियन टेनिसपटू आणि मॉडेल अनेलिया फ्रेझर आहे. तिचा इंस्टाग्राम बायो टेनिस, स्पोर्ट्स मीडिया आणि अभिनेत्री असा अपडेट केलेला आहे.

6 / 9

अनेलिया पूर्वी टेनिस खेळायची, पण आता मात्र ती मॉडेलिंग, अँकरिंग आणि अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. फ्रेझर टेनिस आणि मॉडेलिंग कारकिर्दीतील फोटो कायम शेअर करत असते.

7 / 9

अनेलिया हिचे इन्स्टाग्रामवर ४४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने एका जाहिरातीसाठी युवराजसोबत फोटोशूट केले आहे. त्याच कॅम्पेनमधील पोज व्हायरल झाली आहे.

8 / 9

ही जाहिरात फिनो टकीला या कंपनीसाठी आहे, ज्याचा युवराज सिंग हा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. अनेलिया इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि वारंवार ग्लॅमरस फोटो शेअर करते.

9 / 9

तिने बिकिनी आणि विविध आउटफिट्समध्ये बोल्ड लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या विविध ग्लॅमरस लूकने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधलेले आहे.

टॅग्स :युवराज सिंगटेनिसव्हायरल फोटोज्सोशल व्हायरलसोशल मीडिया