भारतातील महिला क्रिकेट लीग असलेल्या वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)ला कालपासून सुरुवात झाली आहे. या लढतीतील पहिला सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये खेळाडूंच्या खेळासोबतच एका मिस्ट्री अँकरच्या सौंदर्याचीही खूप चर्चा झाली. ही अँकर कोण आहे? याचा शोध फॅन्सकडून घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण ती अँकर कोण आहे, याची माहिती घेऊयात.
डल्ब्यूपीएलच्या सुरुवातीलाच व्हायरल झालेल्या या महिला अँकरचं नाव येशा सागर असं आहे. येशा ही अँकरिंगबरोबरच मॉडेलिंग आणि अभिनयदेखील करते. येशा हिचा जन्म पंजाबमधील कीरतपुर साहिब येथे झाला होता. ती सध्या कॅनडामधील टोरँटो येथे राहते. तिथून ती आपले आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आणि मॉडेलिंग करिअरचं व्यवस्थापन करते.
येशा हिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर तिने काही पंजाबी म्युझिक व्हिडीओंमध्येसुद्धा काम केले. त्याशिवाय येशा हिने भारत आणि परदेशामध्ये काही अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी फोटोशूटदेखील केलेलं आहे. त्यामुळे तिची ओळख ग्लोबल मॉडेल म्हणून झाली आहे.
येशा हिने काही म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलेलं आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये काम केलेलं आहे. विशेष करून गाय बब्बू मान याच्यासह तिची केमेस्टी लोकांना खूप आवडली होती. त्याशिवाय येशा हिने जॉर्डन संधूसोबत तिने केलेलं कामही खूप चर्चेत राहिलेलं होतं.
मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच येशा फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. ती तिचं फिटनेस रुटिन काटेकोरपणे फॉलो करते. तसेच सोशल मीडियावर ती नेहमीच आपले वर्क आऊट करतानाचे पोटो शेअर करते. याशिवाय हेल्दी लाईफस्टाईलशीसंबंधित पोस्टसुद्धा शेअर करत असते.
येशा सागर सोशल मीडियावरसुद्धा खूप चर्चित आहे. तसेच इन्स्टाग्रामवर येशा हिचे सुमारे १.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. येशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच अँकरिंग, ट्रॅव्हलिंग आणि फोटोशूटशी संबंधित पोस्ट शेअर करत राहिली असती.
येशा हिच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं झाल्यास ती खूपच सिक्रेटिव्ह आहे. तिने कधीही आपल्या रिलेशनशिप स्टेटसबाबत कधीही कुठलीही बाब उघड केलेली नाही. ती नेहमी तिचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत मौजमजा करताना दिसते.