इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या आराम करतोय. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ सज्ज होणार आहे. पण त्याआधी वृद्धीमान साहा याचा मुलगा अन्वय याचा पहिला वाढदिवस टीम इंडियानं साजरा केला.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा याच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता.
बर्थ डे पार्टीत विराट आणि अनुष्का देखील सहभागी झाले होते.
वृद्धीमान सहाच्या मुलासह भारतीय संघातील इतर खेळाडूंचे चिमुकले देखील बर्थडे पार्टीचा आनंद घेत होते.