भारतीय महिला क्रिकेट संघातील या ब्युटीफूल चेहरा WPL च्या चौथ्या हंगामातून पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
२३ वर्षीय महिला क्रिकेटरनं आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर बोलताना जसप्रीत बुमराहचा सल्ल्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मक झाल्याची गोष्ट शेअर केली आहे.
ही महिला क्रिकेटर दोन तीन महिने स्वत: एका बंद खोलीत राहिली. काय होत त्यामागचं कारण आणि बुमराहनं दिलेला सल्ला तिच्यासाठी कसा उपयुक्त ठरला? जाणून घेऊयात त्यासंदर्बातील गोष्ट
आपण टीम इंडियातील ज्या ब्युटीसंदर्भात बोलतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून ती श्रेयंका पाटील आहे. २३ वर्षीय स्पिनर २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून सातत्याने दुखापतीचा सामना करताना दिसली.
दुखापतीतून सावरुन महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धत खेळण्याचं स्वप्न पाहत असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना ती पुन्हा दुखापतग्रस्त झाली अन् तिचे कमबॅकचं स्वप्न अधुरेच राहिले.
सातत्याच्या दुखापतीमुळे ती खूप निराश झाली होती. WPL २०२६ च्या हंगामातून कमबॅकसाठी सज्ज असलेली श्रेयंकाने नकारात्मकतेच्या गर्तेत असतानाची मनस्थिती काय होती ते सांगितले आहे.
ती म्हणाली आहे की, मी खूप बोलकी आहे. पण सातत्याच्या दुखापतीमुळे मी निराश झाले होते. मी दोन-तीन महिने स्वत:ला एका खोलीद बंद करुन ठेवले होते.
दुखापतीतून सावरत असताना बंगळुरु स्थित सीओईमध्ये संघातील अन्य सहकाऱ्यांसह पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत साधलेला संवाद हा कमबॅकसाठी उपयुक्त ठरला, असे ती मानते.
बुमराहने दिलेला सल्ला हा दुखापतीतून सावरण्यासाठी लाखमोलाचा ठरला असेही तिने सांगितले. सीओईमध्ये बुमराहला भेटले. गोलंदाजीसह दुखापतीसंदर्भातील समस्यावर आमच्यात बोलणं झाले, अशी गोष्ट तिने शेअर केली.
खेळाडूच्या रुपात प्रत्येकाला कधी ना कधी परिस्थितीतून जावे लागते. तू फार कमी वयात दुखापतीसारख्या गोष्टीचा सामना करत आहेत. लढण्यापेक्षा खंबीर राहा, असा सल्ला बुमराहने दिला. ही गोष्ट मनात ठेवून सावरले, असे श्रेयंका पाटीलनं सांगितले आहे.