Join us  

भारतीय क्रिकेटपटूसह 'डेट'वर जायला सुंदरी तयार, पण ठेवली एक अट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 10:45 AM

Open in App
1 / 10

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. अशात क्रीडा स्पर्धा कधी चालू होतील, हे आताच सांगणे अवघड आहे.

2 / 10

अशात क्रीडापटू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

3 / 10

अशाच एका व्हिडीओ चॅट दरम्यान भारताचा सलामीवीर मुरली विजयनं एका सुंदरीसोबत डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

4 / 10

व्हिडीओ चॅटींग करताना मुरलीनं दोन खेळाडूंसोबत डिनरला जायला आवडेल, असं मत व्यक्त केलं. या दोन व्यक्तिंमध्ये एलिसा पेरी आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.

5 / 10

एलिसा पेरीबद्दल तो म्हणाला,''एलिसा सुंदर आहे, तिच्यासोबत मला डिनरला जायला आवडेल.''

6 / 10

त्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूनं उत्तर दिलं. तिनं मुरलीसोबत डिनर डेटवर जाण्यास होकार दिला, परंतु एक अट ठेवली.

7 / 10

एलिसा म्हणाली,''मी डिनर डेटवर जायला तयार आहे, फक्त बिल मुरलीनं भरायला हवं. त्यानं केलेल्या कौतुकावर मी फिदा झाली.''

8 / 10

ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयी महिला संघाची ती सदस्य आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 120 सामन्यांत तिच्या नावावर 1218 धावा आणि 114 विकेट्स आहेत.

9 / 10

वन डे क्रिकेटमध्येही तिची सरासरी 52.10 इतकी आहे. तिनं 112 वन डे सामन्यांत 3022 धावा केल्या आहेत, तर 152 विकेट्स घेतल्या आहेत.

10 / 10

पेरीनं 8 कसोटी सामन्यांत द्विशतकासह ( 213*) 78च्या सरासरीनं 624 धावा केल्या आहेत, तर 31 विकेट्सही घेतल्या आहेत.

टॅग्स :मुरली विजयआॅस्ट्रेलिया