भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा

Indian Captain Wife Pregnant, Maternity Shoot Photos: २०२१ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले

क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्याचे चाहते भारताच्या कानाकोपऱ्यात हमखास सापडतात. क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासही चाहते उत्सुक असतात.

भारतीय क्रिकेटपटूंच्या मैदानातील आणि मैदानाबाहेरील आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबतच्या बातम्या चाहते चवीचवीने वाचतात आणि आपली आपली मतेही मांडतात.

भारतीय क्रिकेटपटूंची प्रेम प्रकरणं, त्यांच्या लग्नाच्या बातम्या किंवा पत्नीची प्रेग्नंसी या बातम्या हमखास चर्चेत असतात. असेच एक फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

भारतीय क्रिकेट संघाला २०१२ साली १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद याने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

उन्मुक्त चंद याची पत्नी सिम्रन खोसला ही गरोदर आहे. उन्मुक्त आणि सिम्रन यांनी एक छानंसं मॅटर्निटी शूट केलं असून त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

२१ नोव्हेंबर २०२१ ला उन्मुक्त चंद याने सिमरन खोसला हिच्याशी लग्नगाठ बांधली. सिमरन ही न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटेशियन (आहार तज्ज्ञ) आहे.

उन्मुक्त चंद याने भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर त्याला IPL मध्ये संधी मिळाली होती. पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही, त्यामुळे तो संघाबाहेर झाला.

ऑगस्ट २०२१ मध्ये उन्मुक्त चंद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कायमचा अमेरिकेत स्थायिक झाला. सध्या तो लॉस एंजल्स नाइट रायडर्स संघाकडून क्रिकेट खेळतो.