कौतुकास्पद! सिक्युरिटी गार्डच्या लेकीची 'गरूडझेप', लाखोंचा वर्षाव अन् WPL मध्ये एन्ट्री

मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही संकटावर सहज मात करू शकता. प्रामाणिक कष्टांना प्रयत्नांची जोड दिली खडतर परिस्थितीवर सहज मात करत यशाची चव चाखता येते. असा आदर्श या तरूणीने समाजासमोर घातला.

बिजनौर या उत्तरप्रदेशातील गावामध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या मेघना सिंह या महिला खेळाडूने असंख्य तरूणींपुढे नवा आदर्श ठेवला.

मेघना सिंह हिची निवड महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या ऑक्शनमध्ये करण्यात आली आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये खेळाडुंची देवाण-घेवाण करण्यात आली. या लिलावात मेघना सिंह या महिला खेळाडूला ३० लाख रुपयांची बोली लावण्यात आली.

उत्तरप्रदेशमधील बिजनौर या छोट्याश्या गावात राहणारी मेघना सिंह २०२४ च्या महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळणार आहे. शनिवारी झालेल्या महिला प्रिमीअर लीगच्या लिलावात बोली लावलेली मेघना सिंह पहिली खेळाडू ठरली.

मेघना सिंहला लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. अगदी वयाच्या १० व्या वर्षापासून मेघना सिंहने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात केली. मेघनाचा क्रिकेट प्रती असणारी आवड पाहून तिच्या वडिल विजय सिंह यांनी बिजनौर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केला.

महिला क्रिकेटपटू मेघना सिंह तिच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय मेघना सिंह एक उत्तम फलंदाजीदेखील करते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेघना सिंह आज मेहनतीच्या जोरावर भारतीय महिला प्रीमिअर लीगमध्ये स्थान मिळवले आहे.

वडिलांनी सिक्यूरिटी गार्डची नोकरी केली. तर आईने आशा सेविका म्हणून काम करत अत्यंत खडतर परिस्थितीत क्रिकेटपटू मेघनाचे पालनपोषण केले. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत मेघनाचे हे यश थक्क करणारे आहे.