भारतीय क्रिकेट संघात सध्या कॅप्टन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या कपलचीच हवा आहे. सध्याच्या घडीला सर्वात सुंदर कपल म्हणून विरुष्का ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक फोटोवर नेटिझन्स लाईक्सचा पाऊस पाडतात.
यात अधुनमधुन रोहित शर्मा आणि रितिकी सचदेह या क्यूट कपलचीही चर्चा असतेच.
पण, भारतीय संघातील आणखी एक कपल इस्टावर हिट ठरत आहे. मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुष्मिता रॉय...
सुष्मिताचे सौंदर्य एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल अशेच आहे आणि चाहते तिची तुलना कॅटरिना कैफशी करतात. जाणून घेऊया मनोजच्या पत्नीबद्दल काही...
मनोज आणि सुष्मिता हे बालपणीचे मित्र... या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही. जुलै 2013मध्ये या दोघांनी विवाह केला. मनोजपेक्षा सुष्मिता ही सोशल मीडियावर अधिक अॅक्टीव्ह आहे आणि तिचे हॉट फोटोवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात...
सुष्मिताचे इंस्टाग्रावर 47 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. आयपीएल स्पर्धेत ती मनोजसाठी चिअर करताना अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे.
2016मध्ये मनोज आणि सुष्मिता ग्रीसमध्ये गेले होते आणि तेव्हा तिनं तिचे तेथील हॉट फोटो इस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर तिचा ग्लॅमरस लुकची अधिक चर्चा झाली होती.
मनोजनं भारताकडून 12 आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत एका शतकासह ( 104*) 287 धावा केल्या आहेत, तर ट्वेंटी-220 त 3 सामन्यांत त्याने 15 धावा केल्या आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बंगालच्या या खेळाडूनं 114 सामन्यांत 8258 धावा केल्या आहेत. त्यात 26 शतकं व 34 अर्धशतकं आहेत.