मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने जोरदार खेळी करत, सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडले. भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने 45 वे एकदिवसीय शतक झळकावल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेचा आला आहे.
विराटने 87 चेंडूत 113 धावा केल्या. या शतकासह विराटने सचिन तेंडुलकरच्या वनडेमध्ये सर्वाधिक 'होम सेंच्युरी' करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
सध्या सोशल मीडियावर सचिन आणि कोहली यांच्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण अशा चर्चा सुरू आहेत. या संदर्भात माजी खेळाडू गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. आता बीबीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यानेही प्रतिक्रिआ दिली आहे.
'या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. कोहली हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने असे अनेक डाव खेळले आहेत, तो एक विशेष खेळाडू आहे, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली.
कोहलीने मंगळवारी त्याचे 45 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 73 वे शतक झळकावले. सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून विराटला फक्त चार सामने खेळायचे आहेत.
कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कोहलीच्या खेळीमुळे भारताने 7 बाद 373 अशी मोठी धावसंख्या उभारली.
कर्णधार रोहित शर्माने 67 चेंडूत 83 तर शुबमन गिलने 60 चेंडूत 70 धावा केल्या. उमरान मलिक (3/57) आणि मोहम्मद सिराज (2/30) यांनी पाच विकेट्स घेतल्याने भारताने श्रीलंकेला 50 षटकात 8 बाद 306 धावांवर रोखले.
श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाका (नाबाद 108) याने सर्वाधिक धावा केल्या तर पाथुम निसांकाने 72 धावांचे योगदान दिले.
रिषभ पंत याच्या तब्येती संदर्भातही प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर रिषभ पंत आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही, असंही गांगुली म्हणाला.