Join us

Photo : भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारानं केलं 'कोच'शी लग्न; जाणून घ्या कोण आहे सिमरन खोसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:12 IST

Open in App
1 / 8

भारताला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद ( Unmukt Chand) यानं फिटनेस अँड न्यूट्रीशन कोच सिमरन खोसला ( Simran Khosla) हिच्याशी लग्न केलं. ही दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होती आणि रविवारी उन्मुक्त-सिमरन यांनी सात फेरे घेतले.

2 / 8

सिमरन खोसला हिचं इंस्टाग्राम अकाऊंट ‘Buttlikeanapricot’ या नावानं आहे. सिमरनची न्यूट्रीशन कंपनी आहे आणि त्याच नावानं तिचं इंस्टा अकाऊंट आहे. सिमरन सोशल मीडियावर नेहमी तिचे वर्कआऊट व्हिडीओ व फोटो पोस्ट करत असते. तिचे जवळपास ७३ हजार फॉलोअर्स आहेत.

3 / 8

तिनं तिच्या इंस्टा बायोत फिटनेस व स्पोर्ट्स न्युट्रीशन असे लिहिले आहे. ती लाईफ स्टाईल कोचही आहे. २०१९मध्ये तिला इंटरनॅशनल पुरस्कारही मिळाला आहे.

4 / 8

उन्मुक्तनं काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि तो आता अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. त्याला बिग बॅश लीगमध्येही फ्रँचायझीनं करारबद्ध केलं आहे.

5 / 8

उन्मुक्त चंद याने २०१२ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना देशाला विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच फलंदाज म्हणूनही त्याने उल्लेखनीय खेळ केला होता.

6 / 8

दरम्यान, आपल्या कारकिर्दीची दणक्यात करणाऱ्या उन्मुक्त चंदला नंतर फारशी चमक दाखवता आली नाही. आयपीएल तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी सुमार झाली. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर त्याने अमेरिकेतून खेळण्याचा निर्णय घेतला.

7 / 8

सिमरन खोसला जबरदस्त डान्सर आहे.

8 / 8

टॅग्स :उन्मुक्त चंदभारतीय क्रिकेट संघ
Open in App