वर्ल्डकप फायनलमध्ये तब्बल ६ वेळा कॅमेरात दिसली अन् चर्चा सुरू झाली; कोण आहे 'ती'?

ही तरूणी एक सेलिब्रिटी असून तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे

World Cup 2023 Final Mystery Girl : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत भारताने सलग १० विजय मिळवले, पण एका पराभवामुळे भारताचे विश्ववितेपद हुकले.

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश असल्याने अंतिम सामन्यासाठी तब्बल ९० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली. त्यात एका तरूणीवर एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ६ वेळा कॅमेरा मारण्यात आला.

९० हजारांच्या गर्दीत कॅमेरामनने तिच्यावर इतक्या वेळा कॅमेरा मारल्यानंतर 'ती' तरूणी कोण, ही चर्चा सुरू झाली. जाणून घेऊया या मिस्ट्री गर्लबद्दल...

'वर्ल्ड कप फायनलची मिस्ट्री गर्ल' म्हणून सध्या चर्चेत असलेली ही तरूणी एक सेलिब्रिटी आहे. टीव्हीवर अनेकदा दिसलेली ही तरूणी २८ वर्षीय अभिनेत्री असून ती एक राष्ट्रीय पुरस्कार विजेती देखील आहे.

वर्ल्ड कप फायनलमध्ये दिसलेली ती अभिनेत्री म्हणजे प्रकृति मिश्रा. ओरिया सिनेमा आणि हिंदी ओटीटी मालिकांमध्ये ती काम करते. तसेच ती क्रिकेट प्रेमी आहे.

प्रकृति मिश्रा ही ओरिया संगीतकार मन्मथ मिश्रा यांची मुलगी आहे. ही अभिनेत्री भुवनेश्वरमध्ये लहानाची मोठी झाली आहे.

प्रकृति एक प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

ईटीव्ही ओडियाच्या तुलसी भूमिकेमुळे तिला प्रसिद्धीझोतात आणले. त्यानंतर 2009 मध्ये जेव्हा तिला ओडिया चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळाल्या.

अभिमानाचा क्षण असलेला राष्ट्रीय पुरस्कार तिला 2018 साली मिळाला. हॅलो अर्सी या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला पहिलावहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.