आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!

इथं जाणून घेऊयात कोण आहे तो खासदाराचा मुलगा? त्याच्यावर शाहरुख खानच्या केकेआरनं किती रुपयांची बोली लावली आणि त्याचे गंभीरसोबत असणारे खास कनेक्शन यासंदर्भातील माहिती.

आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी अबू धाबी येथे झालेल्या मिनी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. अनेक स्टार क्रिकेटरवर अनसोल्ड राहण्याची वेळ आली. ज्या ७७ खेळाडूंवर बोली लागली त्यातील एक खेळाडू हा खासदाराचा मुलगा आहे.

इथं जाणून घेऊयात कोण आहे तो खासदाराचा मुलगा? त्याच्यावर शाहरुख खानच्या केकेआरनं किती रुपयांची बोली लावली आणि त्याचे गंभीरसोबत असणारे खास कनेक्शन यासंदर्भातील माहिती.

अबू धाबी येथील IPL च्या मिनी लिलावात KKR च्या संघाने सार्थक रंजक याला ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या संघात सामील करून घेतले. हा क्रिकेटर बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांचा मुलगा आहे.

सार्थक रंजक हा उजव्या हाताने फलंदाजीसह लेग स्पिनर गोलंदाजीसह संघासाठी उपयुक्त ठरु शकेल असा खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो दिल्लीच्या संघाकडून खेळतो. दिल्ली प्रिमियर लीगमध्ये त्याने आपल्या धमाकेदार कामगिरीचा खास नजराणाही दाखवून दिला आहे.

२०१६-१७ मध्ये सार्थक रंजक याने दिल्लीच्या संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते. या हंगामात तो भारताचा माजी क्रिकेटर आणि विद्यमान कोच गौतम गंभीर याच्यासोबत दिल्लीच्या डावाची सुरुवातही केली होती.

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स संघाकडून खेळताना त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ९ सामन्यातत्याने १४६.७३ च्या सरासरीसह ४४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे KKR च्या संघाकडून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सार्थक रंजक हा क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय फिटनेस आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत राहणारा चेहरा आहे.

२९ वर्षीय क्रिकेटर महादेवाचा भक्त आहे. सध्याच्या पिढीत स्टाइल स्टेटमेंटचा प्रमुख भाग बनललेल्या टॅटूच्या माध्यमातून त्याने शिव भक्तीची भावना जपल्याचेही तुम्हाला या फोटोतून पाहायला मिळेल.

फिल्डहबाहेर हिरोच्या तोऱ्यात मिरवणारा हा क्रिकेटर शाहरुखच्या संघाकडून खेळताना मैदानात हिरोगिरी दाखवून देत IPL मध्ये छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.

लेकाला आयपीएलमध्ये बोली लागल्यावर खासदार पप्पू यादव यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. चांगला खेळ. क्रिकेटच्या मैदानात नाव कमाव. सार्थक ही आमची ओळख व्हायला हवी, अशा आशयाच्या शब्दांत पप्पू यादव यांनी लेकाला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले होते.