Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे Samreen Kaur? पंजाबी मुंडा अर्शदीप सिंगसोबत नाव जोडलं गेल्याने अभिनेत्री चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:14 IST

Open in App
1 / 8

टीम इंडियाचा स्टार आणि पंजाब किंग्स संघाचा गोलंदाजीतील हुकमी एक्का अर्शदीप सिंग सध्या फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत आला आहे.

2 / 8

दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन गोलंदाजाने एका तरुणीचा हातात हात घेऊन काढलेला फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आणि तो प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

3 / 8

इथं जाणून घेऊयात कोण आहे समरीन कौर? जिच्यासोबत जोडलं जात आहे क्रिकेटर अर्शदीप सिंगच नाव? ती करते तरी काय?

4 / 8

समरीन कौर ही पंजाबी सिनेसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेत्री आहे. सोशल मीडियाव ती चांगलीच सक्रीय असून तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा ४.४ मिलियनच्या घरात आहे.

5 / 8

अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये आपल्या अदाकारीची खास झलक दाखवून देणाऱ्या या अभिनेत्रीनं १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघावर आधारीत '८३' या हिंदी चित्रपटात क्रिकेटरच्या होणाऱ्या पत्नीची छोटीखानी भूमिका साकारली होती.

6 / 8

समरीन कौर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आयपीएलमध्ये पंजाब किंग्सला सपोर्ट करतानाचे काही खास फोटोही शेअर केल्याचे पाहायला मिळते. गतं हंगामात ती पंजाब किंग्सच्या संघाला चीअर करताना दिसली होती.

7 / 8

समरीन कौरचा जन्म २०२१ मध्ये जम्मू आणि काश्मीर येथे झाला. ती २६ वर्षांची असून अर्शदीप सिंगपेक्षा ती एका वर्षांनी छोटी आहे .

8 / 8

पंजाबी अभिनेत्री अन् पंजाबी मुंडा अर्शदीप सिंग यांच्यात प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा सुरु असली तरी दोघांनी नात्यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :अर्शदीप सिंगऑफ द फिल्डआयपीएल २०२६पंजाब किंग्सभारतीय क्रिकेट संघ