महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिचा खास सन्मान करण्यात येणार आहे.
आंध्र क्रिकेट असोसिएशन -विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन (ACA-VDCA) स्टेडियम, विशाखापट्टणम येथील स्टँडला मितालीच नाव देण्यात आलं आहे. याशिवाय रवी कल्पना रेड्डी हिच्या नावाचे स्टँडही इथं उभारण्यात आलंय.
इथं जाणून घेऊयात कोण आहे. रवी कल्पना रेड्डी? टीम इंडियाकडून फार कमी काळ आणि अगदी मोजक्या सामने खेळूनही तिला मितालीच्या बरोबरीनं एवढा मोठा सन्मान कसा मिळाला यासंदर्भातील खास गोष्ट
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणाऱी रवी कल्पना हिने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय महिला संघाकडून वनडेत पदार्पण केले होते. ती विकेट किपर बॅटरच्या रुपात संघात सामील झाली होती.
२८ जून २०१५ मध्ये तिने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून बंगळुरुच्या मैदानात पदार्पण केले. १९ फेब्रुवारी २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ती अखेरचा वनडे सामना खेळली होती.
टीम इंडियाकडून ७ वनडे सामने खेळले. यातील ३ डावात तिच्या खात्यात ४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर स्टेडियम स्टँडला या क्रिकेटरचं नाव कसं दिलं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
१८ व्या वर्षी पदार्पण अन् वयाच्या २६ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारी ही विकेट किपर बॅटर आंध्र प्रदेशातील मुलींसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनिय कामगिरीशिवाय टीम इंडियाकडून खेळणारी आंध्रची पहिली महिला क्रिकेटर आहे.
आंध्र क्रिकेटअसोसिएशनकडून स्टेडियमवरील स्टँडला महिला क्रिकेटचं नाव देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडलेल्या मिताली राजसोबत आपल्या असोसिशनचं नाव करणाऱ्या आणि राज्यातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या रवी कल्पनाच्या नावाला पसंती दिलीये. या क्रिकेटरसाठी ही खूपच मोठी आणि अभिमान्सपदाची गोष्ट आहे.