कोण आहे Ishani Johar? टीम इंडियाचा क्रिकेटर Rahul Chahar शी ४ वर्षात मोडला संसार (PHOTOS)

Who is Ishani Johar, Rahul Chahar Ex Wife: २२व्या वर्षी प्रेमविवाह करणाऱ्या राहुलने चार वर्षातच ईशानीला घटस्फोट दिला

टीम इंडियाचा लेग-स्पिनर आणि IPL मध्ये MI, CSK कडून खेळणारा स्टार राहुल चहर याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे.

राहुल आणि त्याची पत्नी ईशानी जोहर यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला असून त्यांच्या ४ वर्षांच्या वैवाहिक प्रवासाला पूर्णविराम देण्यात आला आहे.

राहुलने स्वतः सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करून या कठीण प्रवासाची आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती चाहत्यांना दिली आहे.

ईशानी जोहर ही व्यवसायाने एक फॅशन डिझायनर आहे. राहुल आणि ईशानी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.

मूळची जयपूरची (राजस्थान) असलेली ईशानी सध्या बेंगळुरूमध्ये स्थायिक असून तिने फॅशनच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फॅशन इंडस्ट्री व्यतिरिक्त, ईशानी प्रशासकीय सेवेचे ध्येय बाळगून आहे. त्यामुळेच ती आयएएस (IAS) अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे आणि मेहनत घेत आहे.

ईशानीला नृत्याची प्रचंड आवड असून ती योगाभ्यासातही पारंगत आहे. तिच्या स्वभावाची झलक तिच्या सोशल मीडियावरूनही स्पष्ट होते.

दीर्घकाळ डेट केल्यावर राहुल ईशानीचा २०२२ मध्ये गोव्यात भव्य लग्नसोहळा झाला. मात्र, काही काळातच मतभेद झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.