कोण आहे तो 'पंजाबी मुंडा'? ब्रेकअपनंतर वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरला मिळालं नवं प्रेम

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन महिला फिरकीपटू अमांडा वेलिंग्टन भारताची सून होणार असल्याची गोष्ट चर्चेत आहे.

क्रिकेटचं मैदान गाजवणारे खेळाडू अनेकदा मैदानाबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत असतात. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन महिला फिरकीपटू अमांडा वेलिंग्टन भारताची सून होणार असल्याची गोष्ट चर्चेत आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरनं सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खास फोटो शेअर करत ताजमहाल येथे पंजाबी मुंड्यासोबत साखरपुडा उरकल्याची गोष्ट शेअर केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार महिला क्रिकेटर ज्या पंजाबी भारतीयाच्या प्रेमात पडली आहे. त्याचे नाव हमराज ढलिवाल असं आहे. तो मूळचा पंजाबचा असला तरी सध्या तो ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाला आहे. तो भारतीय वशाच्या असल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर भारताची सून होणार असे बोलले जात आहे.

हमराज हा दक्षिण ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड येथे राहतो. इथंच त्याने आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. अ‍ॅडलेड स्ट्रायकरकडून तो स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये लेग-स्पिनरच्या रुपात खेळतो. कमालीचा योगायोग म्हणजे अमांडा ही देखील लेग स्पिनर आहे. क्रिकेट याच गोष्टीमुळे ही जोडी जमली आहे.

भारतीय वंशाच्या पंजाबी क्लब क्रिकेटरच्या प्रेमात पडण्याआधी वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर अमांडा वेलिंग्टन २०१९ च्या महिला बिग बॅश लीगच्या हंगामात एक्स बॉयफ्रंडसोबतच्या खास प्रपोजलमुळे चर्चेत आली होती. मॅचनंतर टेलर मॅकेक्नी (Tayler McKechnie) नावाच्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला भर मैदानात प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले होते.

एक्स बॉयफ्रेंडसोबतचा प्रेमाचा खेळ खल्लास झाल्यावर आता ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर सनम मेरे हमराज.. हे गाणं गाताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून खास फोटो शेअर करत ती नव्या प्रेमाची खास झलक दाखवून देत आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरच्या पंजाबी प्रेमानंतर या जोडीच्या लग्नाची फ्रेम लवकरच पाहायला मिळणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

पंजाबची सून होणाऱ्या ऑस्ट्रेलियन वर्ल्ड चॅम्पियन छोरीनं दिलजीत दोसांझसोबतचे काही खास फोटोही शेअर करून पंजाबी संस्कृतीशी असलेले आपले खास बॉन्डिंग दाखवून दिले आहे.