WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील या छोरीनं WPL मध्ये रचला नवा इतिहास; जाणून घ्या तिच्यासंदर्भातील खास गोष्ट

महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामातील चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळणाऱ्या पहिला हंगाम खेळणाऱ्या अनकॅप्ट भारतीय गोलंदाजाने कमाल करुन दाखवली.

WPL मधील गुजरात जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण गल्ली ते दिल्ली असा प्रवास करणारी छोरी रातोरात स्टार बनली.

कोण आहे ही नवी 'हॅटट्रिक क्वीन' जाणून घेऊयात तिचा इथपर्यंतचा प्रवास

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या नंदिनी शर्माचा जन्म २० सप्टेंबर २००१ मध्ये चंदिगड येथे झाला.

चंदिगडच्या गल्लीतून क्रिकेट खेळत या खेळाच्या प्रेमात पडलेल्या नंदिनीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चंदिगडच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्वही केले आहे.

चंदिगडच्या संघाशिवाय तिने नॉर्थ झोन आणि इंडिया बी संघाचे प्रतिनिधीत्व करताना खास छाप सोडली आहे.

चेंडू स्विंग करण्यात ही अनकॅप्टड महिला गोलंदाज माहिर आहे. बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तिने आउटस्विंग चेंडूसंदर्भात खूप मेहनत घेतली आहे.

गुजरात जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात ३३ धावा खर्च करत तिने ५ विकेट्सचा डाव साधत ऐतिहासिक हॅटट्रिक नोदंवली.

WPL मध्ये हॅटट्रिकचा डाव साधणारी ती चौथी गोलंदाज आहे. एवढेच नाही तर WPL च्या इतिहासात पाच विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाजही ठरली आहे.

WPL च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने तिला २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या संघात घेतले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट्स घेत तिने आपल्यातील धमक दाखवली.

WPL च्या पहिल्या दोन सामन्यात धमक दाखवत या छोरीनं यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत.

याआधीही WPL मध्ये धमक दाखवून काही महिला खेळाडूंनी टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. नंदिनी शर्माही यंदाचा हंगाम गाजवत हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.