पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल याने दमदार अर्धशतक झळकावले. त्याचे हे अर्धशतक व्यर्थ ठरले. पण या सामन्यात पहिल्या षटकात षटकार मारून त्याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारलीये.
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर पोहचला आहे.
यशस्वी जैस्वालनं अर्शदीपला मारलेल्या षटकारासह ११ षटकारांसह विराट कोहलीची बरोबरी केलीये. एक नजर आयपीएमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून डावाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीनं आतापर्यंत पहिल्या षटकात ११ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलम त्याने २००८ ते २०१८ या कालावधीत आयपीएलमध्ये १०९ सामने खेळले. यात पहिल्या षटकात त्याने १० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
वीरेंद्र सेहवागने २००८ ते २०१५ या कालावधीत आयपीएलमध्ये पहिल्या षटकात एकूण १२ षटकार मारल्याचा विक्रम आहे.
ख्रिस गेलनं २००९ ते २०२१ या कालावधीत आयपीएलमध्ये १४२ सामने खेळताना पहिल्या षटकात १२ षटकार मारले आहेत.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा रोहित शर्माच्या नावे आहे. मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या हिटमॅनने आतापर्यंत पहिल्या षटकात १३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.