Join us

सचिन तेंडुलकर जेव्हा तब्बल पाच वर्षांनी मैदानात उतरतो तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 15:25 IST

Open in App
1 / 6

सचिन नोव्हेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर काही प्रदर्शनीय सामन्यांमध्ये सचिन खेळला होता.

2 / 6

गेल्या पाच वर्षांमध्ये सचिनने एकही सामना खेळला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी तब्बल पाच वर्षांनी सचिन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

3 / 6

पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान तेंडुलकर चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाला.

4 / 6

या सामन्यापूर्वी सचिनने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली होती. तेंडुलकर म्हणाला होता की,''मलाही ही संकल्पना आवडली. मला मैदानावर उतरून एक षटक खेळायला नक्की आवडेल. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे, तरीही मी खेळेल. तुमच्या संकल्पनेतून आशा करतो की आपण पुरेसा निधी गोळा करू शकू.''

5 / 6

या सामन्यातील पाँटिंग एकादश संघाचे प्रशिक्षकपद सचिनकडे देण्यात आले होते. पण सचिन या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम होता. पण आपण या सामन्यात खेळणार असल्याचे सचिन सांगत हा संभ्रम दूर केला होता.

6 / 6

सचिनबरोबर यावेळी वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारादेखील यावेळी उपस्थित होता. बऱ्याच दिवसांनी हे दोन दिग्गज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच होती.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलिया