सामन्यानंतर प्रीतीने चक्क कुरनबरोबर भांगडा केल्याचे पाहायला मिळाले.
कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्यात चर्चेचा विषय ठरली.
या हॅट्ट्रिकनंतर पंजाबची मालकिण असलेल्या प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेनासा होता.
रिषभ पंत ( 39) आणि कॉलीन इंग्राम ( 38) यांच्या 62 धावांच्या भागीदारीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवावा लागला.
20 वर्ष व 302 दिवसांचा सॅम कुरन हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये हॅटट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला.
कुरनने रोहित शर्माचा विक्रम मोडला. 2009 मध्ये रोहितने 22 वर्ष व 6 दिवसांचा असताना हॅटट्रिक घेतली होती.
आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा कुरन हा 16 वा गोलंदाज ठरला, तर किंग्स इलेव्हन पंजाबचा तिसरा.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कुरनने 2.2 षटकांत 11 धावा देत 4 फलंदाज बाद केले.