देशांतर्गत क्रिकेटमध्ये वसीम जाफरची बादशाहत पाहायला मिळाली आहे. त्याच्या नावे सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे.
दुलीप कंरडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो आघाडीवर आहे. जाफरनं १९९७ ते २०१३ या कालावधीत ३० सामन्यात ८ शतके आणि १३ अर्धशतकासह २५४५ धावा कुटल्या आहेत.
टीम इंडियाच्या ताफ्यात कोच स्टाफच्या दिसलेल्या विक्रम राठोड यांनी १९९३ ते २००२ या कालावधीत २५ सामन्यात या स्पर्धेत २२६५ धावा केल्या आहेत. यात ६ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
अंशुमन गायकवाड यांनी १९७४-८७ या कालावधीत २६ सामन्यात ९ शतके आणि ४ अर्धशतकांच्या जोरावर दुलीप करंडक स्पर्धेत २००४ धावा केल्या आहेत.
अजय शर्मा या दिग्गज क्रिकेटरनं १९८४ ते १९९७ या कालावधीत २६ सामन्यात दुलीप करंडक स्पर्धेत ७ शतके आणि ९ अर्धशतकाच्या जोरावर १९६१ धावा केल्या आहेत.
क्रिकेटरच्या तुलनेत समालोचकाच्या रुपात क्रिकेट वर्तुळात छाप सोडणाऱ्या आकाश चोप्रा यांनी १९९७ ते २०११ या कारकिर्दीत २६ सामन्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकासह दुलीप करंडक स्पर्धेत १९६१ धावा काढल्या आहेत.
सुनील गावसकर यांनी १९७२-८६ या कालावधीत २२ सामन्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकाच्या मदतीने या स्पर्धेत १८५९ धावा केल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या स्पर्धेत ८ सामन्यातील ११ डावात ३ शतकासंह एका अर्धशतकाच्या जोावर ६०४ धावा केल्या आहेत.