Join us

Cricketers: लग्नाआधीच बाप बनले हे सहा क्रिकेटपटू, यातील एक तर लग्न न करताच राहतो दोन गर्लफ्रेंड्ससोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 10:42 IST

Open in App
1 / 7

क्रिकेटर्स आणि त्यांची अफेअर्स हा काही नवा विषय नाही. बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत क्रिकेटपटूंच्या प्रेमाचे किस्से तर अनेक दशकांपासून सांगितले जातात. यातील काहींचे प्रेम यशस्वी झाले तर काही अपयशी ठरले. काही लग्नाआधीच त्यांच्या मुलांचे बाप झाले, अशा क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा...

2 / 7

वेस्ट इंडिजचे धडाकेबाज माजी फलंदाज व्हिव रिचर्ड्स हे बॉलिवून अभिनेत्री नीना गुप्ता हिच्या प्रेमात पडले होते. एकमेकांना डेट केल्यावर ते एका मुलीचे बाप बनले. मात्र त्यांनी लग्न केले नाही. त्यांची कन्या मसाबा गुप्ता ही भारतातील प्रसिद्ध डिझायनर आहे.

3 / 7

भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. त्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टँकोव्हिक हिच्यासोबतच्या साखरपुड्याबाबत अचानक अपडेट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र लग्न करण्याआधीच हार्दिक पांड्या एका मुलाचा बाप बनला. त्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी लग्न केले.

4 / 7

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडिस वॉर्नरसुद्धा एकमेकांसोबत लग्न करण्यापूर्वी आई-वडील बनले होते. २०१४ मध्ये कँडिसने आपली पहिली पत्नी इव्ही हिला जन्म दिला होता. क्रिकेट विश्वचषकानंतर एक वर्षानंतर दोघांनी लग्न केले. आता वॉर्नरला तीन मुली आहे.

5 / 7

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी एक गुणवान खेळाडू होता. पण दुर्दैवाने त्याची कारकीर्द फार बहरली नाही. कांबळीने आधी प्रेयसी नोएला लुईस हिच्याशी लग्न केले. मात्र ते फार काळ टिकले नाही. त्यानंतर विनोद कांबळी अँड्रिया हेविट हिच्या प्रेमात पडला. हे जोडपे लग्नाआधीच आई-वडील बनले. त्यानंतर त्यांनी लग्न केले.

6 / 7

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याचेही नाव लग्नाआधी बाप बनलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत आहे. रूट २०१७ मध्ये पहिल्यांदा पिता बनला. मात्र २०१६ मध्येच त्याने प्रेयसी कॅरी कॉटरेल हिच्याशी साखरपुडा केला होता. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांनी लग्न केले.

7 / 7

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो तर या सर्वांमध्ये वरचढ ठरला आहे. ड्वेन ब्राव्होच्या दोन गर्लफ्रेंड आणि तीन मुले आहे. तीन मुलांचा बाप बनल्यानंतरही ब्राव्होने अद्याप लग्न केलेलं नाही. ब्राव्हो खैता गोंझालवेझ आणि रेझिना रामजित या दोन गर्लफ्रेंड्सच्या मुलांचा बाप आहे. ब्राव्होची मोठी मुलगी ड्वेनिक १७ वर्षांची आहे. तर दुसरी मुलगी आणि मुलगा खूप लहान आहेत.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटहार्दिक पांड्याडेव्हिड वॉर्नरजो रूट
Open in App