भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी नुतकीच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो''मध्ये उपस्थिती लावली होती. कॉमेडी शोमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनी खूप धमाल केली
सेहवागनं यावेळी भारतीय संघाशी निगडीत अनेक गमतीजमती शेअर केल्या. तसंच कपिल शर्मा यानं वीरु जेव्हा याआधी एकदा शोवर आले होते तेव्हा त्याच्या एका वक्तव्याची आठवण करुन दिली.
भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटूंनी यासाठी लग्न केलं की त्यांना पत्नीकडून इंग्रजी शिकता येईल असं सांगत वीरेंद्र सेहवागनं कपिलच्या शोमध्ये काही क्रिकेटपटूंची नावं घेतली होती.
'हरभजन सिंग, युवराज सिंग आणि आणखी काही क्रिकेटपटूंनी लग्न केलं जेणेकरुन त्यांना चांगलं इंग्रजी शिकता येईल', असं सेहवागनं कपिल शर्माच्या शोमध्ये एकदा म्हटलं होतं.
कपिलनं वीरुला त्याच्या विधानाची आठवण करुन दिल्यानंतर यावेळी सेहवागनं त्यात आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचं नाव घेतलं आहे.
इंग्रजी शिकता यावं यासाठी लग्न केलेल्या क्रिकेटपटूंमध्ये माजी कर्णधार कपिल देव यांच्याही समावेश आहे, असं सेहवाग म्हणाला.
रुमी देव या कपिल देव यांच्या पत्नी आहेत. तर सेहवागनं २००४ साली आरती अहलावत हिच्याशी लग्न केलं होतं. हरभजन सिंगचं अभिनेत्री गीता बसरा हिच्याशी लग्न झालं आहे. तर युवराज सिंग २०१६ साली अभिनेत्री हेजल किच हिच्याशी विवाहबद्ध झाला.
कपिल शर्माच्या शोमध्ये सेहवाग आणि कैफ यांनी खूप धमाल केली. यावेळी दोघांनी आपल्या क्रिकेटच्या दिवसांतील अनेक गमतीजमती आणि ड्रेसिंग रुपमधील किस्से शेअर केले.