विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. यासाठी विराट सेनेने कसुन सराव केला.
नागपुरात दुसऱ्या कसोटीत एक डाव २३९ धावांनी विजय मिळवित भारताने १-० अशी आघाडी घेतली होती.
याआधी ओळीने आठ मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या संघाने केली.
कोटलावर सामना बरोबरीत राहिला तरीही सलग नऊ सामने जिंकण्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी भारत बरोबरी करेल.