तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताची गोलंदाजी निष्प्रभ ठरली.
श्रीलंकेच्या धनंजय डि'सिल्व्हाने शतकी खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवला.
संपूर्ण दिवसभरात भारतीय गोलंदाजांना केवळ दोन बळी टिपता आले.
विजयाची संधी हुकल्याची निराशा भारतीय क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
मालिका विजयाच्या चषकासह भारतीय संघ.