Join us

विराट वर्ल्ड कपनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मधून निवृत्त होणार? एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 18:06 IST

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक २०२३ मध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. किंग कोहलीने पाकिस्तानविरुद्ध झंझावाती शतक झळकावून सचिनच्या विक्रमाकडे कूच केली.

2 / 10

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारतीय संघाने २-० ने मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतून नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे.

3 / 10

भारतीय संघासह तमाम भारतीयांच्या नजरा २०२३ च्या वन डे विश्वचषकावर आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.

4 / 10

खरं तर भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकानंतर विराट कोहली वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त होईल, असा दावा डिव्हिलियर्सने केला आहे.

5 / 10

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, आगामी वन डे विश्वचषक २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला जाईल. विराट कोहली पुढचा विश्वचषक खेळेल असे मला वाटत नाही, हे सांगणं कठीण आहे.

6 / 10

'२०२७ च्या विश्वचषकाला अजून बराच वेळ आहे. पण, भारतीय संघ विश्वषक जिंकेल यापेक्षा मोठी बाब विराटसाठी कोणतीच नसेल. हे विराटसाठी खूप मोठे गिफ्ट असेल', असेही डिव्हिलियर्सने सांगितले.

7 / 10

लक्षणीय बाब म्हणजे आगामी वन डे विश्वचषकानंतर विराट कोहली वन डे आणि ट्वेंटी-२० फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो, असा दावा डिव्हिलियर्सने केला.

8 / 10

डिव्हिलियर्सच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली पुढील काही वर्ष केवळ कसोटी क्रिकेट आणि आयपीएल खेळू शकतो. मात्र, अद्याप विराटने याबद्दल कधीच भाष्य केले नाही.

9 / 10

विराटचे वय सध्या ३४ वर्ष असून त्याचा फिटनेस पाहता तो इतक्यात निवृत्त होणार नाही असा विश्वास विराटच्या चाहत्यांना आहे.

10 / 10

टॅग्स :विराट कोहलीवन डे वर्ल्ड कपएबी डिव्हिलियर्सभारतीय क्रिकेट संघरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर