फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 2019सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या अव्वल शंभर जणांच्या यादीत स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय ठरला आहे. पण, तो कितव्या क्रमांकावर आहे, हे वाचून तुम्हाला धक्का बसेल.
फोर्ब्सनं जाहीर केलेल्या या यादीत अर्जेंटिना आणि बार्सिलोना फुलबॉल क्लबचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी 127 मिलियन डॉलर इतक्या उत्पनासह अव्वल स्थानावर आहे
पोर्तुगाल आणि युव्हेंटस फुटबॉल क्लबचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 109 मिलिय डॉलर उत्पनासह दुसऱ्या स्थानावर आहे
ब्राझील आणि सेंट पॅरिस जर्मेनचा नेयमार 105 मिलियन डॉलर
मेक्सिकोचा बॉक्सर कॅनेलो अल्वारेज 94 मिलियन डॉलर
स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर 93.4 मिलियन डॉलर
अमेरिकन फुटबॉलपटू रसेल विल्सन 89.5 मिलियन डॉलर
अमेरिकन फुटबॉलपटू अॅरोन रॉजर्स 89.3 मिलियन डॉलर
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स 89 मिलियन डॉलर
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टीफन करी 79.8 मिलियन डॉलर
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू केव्हीन डुरांट 65.4 मिलियन डॉलर
या क्रमवारीत विराट कोहलीनं शंभरावं स्थान पटकावलं आहे. त्याची वर्षभराची कमाई 25 मिलियन डॉलर इतकी आहे. गतवर्षी कोहली 83व्या स्थानी होता.