Join us

WTC: तेरा यार हूँ मै... मैदानात दिसली रोहित-विराटची 'दोस्ती' अन् धमाल-मस्ती (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 14:46 IST

Open in App
1 / 6

Virat Kohli Rohit Sharma Friendship, WTC Final 2023: एक काळ असा होता की विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि त्यांच्यात वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून रोहित आणि विराटमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. दोघांनीही त्यांच्या मैत्रीवर उठवण्यात आलेल्या प्रश्नचिन्हावर चोख प्रत्युत्तर दिले आहे.

2 / 6

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघ कसून सराव करत आहेत. सराव सत्रादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील बाँडिंगही पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू मैदानावर खूप मस्ती करताना दिसले.

3 / 6

ओव्हल येथील भारताच्या सराव सत्रातून काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये विराट कोहली काहीतरी मस्ती करताना दिसतोय. अशा स्थितीत रोहित विराटची मजा लुटताना आणि हसताना दिसत आहे. दोघांमध्ये असलेले मैत्रीचं नातं ही टीम इंडियासाठी चांगले लक्षण आहे.

4 / 6

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची फलंदाजी खूप महत्त्वाची आहे. कारण विराट हा भारताचा प्रमुख फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर इतर खेळाडूंचे मनोबलही वाढेल.

5 / 6

संघाचा कर्णधार रोहित शर्माने ओव्हलवर खेळताना शानदार शतक झळकावले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध 127 धावांची अप्रतिम खेळी केली होती. फायनलमध्येही कर्णधाराकडून अशीच खेळी आवश्यक असेल.

6 / 6

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 7 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. भारतीय खेळाडू अतिशय फ्रेश आणि चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत. अशा स्थितीत यंदा भारताचा 10 वर्षे आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App