Join us

BCCI कडून कोहलीला किती पगार मिळतो? कसोटीतील निवृत्तीमुळे ती रक्कम कमी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:32 IST

Open in App
1 / 9

विराट कोहली हा क्रिकेटसह अन्य माध्यमातून मोठी कमाई करणारा क्रिकेटर आहे. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.

2 / 9

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केल्यावर कोहलीनं निवृत्ती घेतलीये. टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही त्याला A + कॅटेगरीत ठेवण्यात आले होते.

3 / 9

4 / 9

इथं जाणून घेऊयात बीसीसीआयकडून त्याला किती पगार मिळतो? कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे त्याला मिळणारी रक्कम कमी होईल का? यासंदर्भातील माहिती

5 / 9

बीसीसीआयकडून विराट कोहलीला ७ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज आहे. तो ज्या सर्वोच्च A + श्रेणीत आहे त्या श्रेणी तिन्ही फॉर्मेटमध्ये नियमित सदस्य असलेल्या खेळाडूंचा समावेश होता.

6 / 9

विराट कोहलीचे संघातील महत्त्व लक्षात घेऊन बीसीसीआयने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही त्याला सर्वोच्च कॅटेगरीतून सर्वाधिक पगार घेणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत कायम ठेवले.

7 / 9

कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळणार असला तरी वार्षिक करारावर त्याचा परिणाम होणार नाही. पण त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कमाईवर त्याचा परिणाम निश्चितच होईल.

8 / 9

७ कोटींच्या वार्षिक पॅकेजसह विराट कोहलीला एका कसोटीसाठी जवळपास १५ लाख रुपये मिळायचे. टी-२० तील एका सामन्यासाठी ३ लाख एवढी त्याची कमाई होती. दोन्ही प्रकारातून निवृत्ती घेतल्यामुळे बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पगारातील १८ लाख रुपये कमी होतील.

9 / 9

आता किंग कोहली क्रिकेटमध्ये ७ कोटी पॅकेजसह प्रत्येक वनडेसाठी ६ लाख रुपये कमाई करु शकतो.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय