दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."

Virat Kohli after Team India Win, IND vs AUS: विराट कोहलीवर सुरूवातीला तुफान टीका करण्यात आली...

भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. रोहित शर्माने नाबाद १२१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीनेही नाबाद अर्धशतक ठोकले. विजयानंतर त्याने रोखठोक मत मांडले.

"जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने घडत नाहीत, तेव्हा तुमच्यासमोर खूप आव्हानं उभी राहतात. पण अशी आव्हाने तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करून घेतात आणि तुम्हाला यशस्वी करतात"

"रोहितबरोबर फलंदाजी करणं मला खूप सोपं गेलं. आम्ही दोघांनी सामना जिंकवला याचा मला आनंद आहे. रोहित आणि मी खूप वर्षांपासून एकत्र खेळतोय. त्यामुळे आम्ही एकमेकांना नीट समजू शकतो."

"आम्हा दोघांनाही सुरुवातीपासूनच खेळाची उत्तम समज आहे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला खेळ समजून घेणं जमलंच पाहिजे. सुरुवातीपाासूनच आम्ही एकत्र खेळून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारलीये."

"२०१३ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच आमच्या पार्टनरशिपची सुरुवात झाली. आता सगळ्यांना माहितीये की, आम्ही २० षटके एकत्र खेळलो तर सामना भारताच्या बाजूने झुकणार."

"मालिकेच्या सुरुवातीला दोनदा शून्यावर बाद झालो होतो. आज पहिली धाव घेतल्यावर खूप बरं वाटलं. इतके वर्ष खेळूनसुद्धा एक धाव काढणे किती कठीण असते, ते क्रिकेटने मला दाखवून दिलं."

"ऑस्ट्रेलियामध्ये येणं आम्हाला कायमच आवडतं. या देशात आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो. इथल्या प्रेक्षकांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी सगळ्यांचे आभार," असे विराट म्हणाला.