टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या हंगामात विराट कोहलीसह फक्त तीन फलंदाज असे आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा २०० धावांचा टप्पा पार केला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील दहाव्या हंगामातील स्पर्धा खेळवण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात श्रीलंकेचा बॅटर पथुम निसंका याने २०० धावांचा टप्पा पार करत थेट किंग कोहलीच्या पंक्तीत एन्ट्री मारली आहे.
पथुम निसंका याने तिसऱ्या हंगामात २०० धावांचा डाव साधला आहे. याआधी निसंकाने २०२१ च्या हंगामात २२१ आणि २०२२ च्या हंगामात २१४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
यंदाच्या हंगामात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या इंग्लंडच्या जोस बटलरचाही या यादीत समावेश आहे. त्याने २०२१ च्या हंगामात २६९ धावा केल्या होत्या. २०२२ च्या हंगामात त्याने २२५ तर २०२४ च्या हंगामात २१४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
सर्वाधिक वेळा २०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीच किंग आहे. २०१४ च्या हंगामात त्याने ३१९ धावा केल्या होत्या.
याशिवाय विराट कोहलीनं २०१६ च्या हंगामात २७३ तर २०२२ च्या हंगामात २९६ धावा करत खास छाप सोडली होती.
पाकिस्तानचा साहिबजादा हा विराट कोहलीच्या ऑलटाइम विक्रमाचा पाठलाग करत आहे. यंदाच्या हंगामात त्याने २८३ धावा केल्या आहेत.
किंग कोहलीचा ऑलटाइम विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला अजूनही ३७ धावांची गरज आहे. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध सुपर ८ मधील अखेरचा सामना खेळणार आहे. यंदाच्या हंगामातील पाकसह साहिबजादासाठी तो अखेरचा सामना ठरू शकतो. त्यामुळे या डावात जर त्याला हा आकडा गाठता आला नाही तर किंग कोहलीचा विक्रम अबाधितच राहिल.